
नाशिक (प्रतिनिधी) गुरुमंत्राच्या जपाने थोराच्या चरित्राचे महत्त्व सांगून थोरांचे चरित्र हे शाळेमध्ये शिकविले गेले पाहिजे,कारण हेच चरित्रे प्रत्येक व्यक्तीला व समाजाला घडवित असते.आणि आपण सर्व या सावरकरांच्या भूमीत आहोत,याची प्रचिती त्यांनी करुन दिली.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील मोजके प्रसंग व स्वातंत्र्याचा खरा इतिहास सांगून ते राष्ट्रवादाचे खरे आदर्श व एक महान पुरुष होते,असे गौरवोद्गार विद्यावाचस्पती,गुरुदेव मा.श्री शंकर अभ्यंकर यांनी काढले.कुर्तकोटी शंकराचार्य संकुल जुना गंगापूर नाका,नाशिक येथे स्वर्गीय सौ.रत्नप्रभा प्रभाकर वैशंपायन यांच्या पुण्यतिथी ६,मार्च मातृदिन कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.

पुढे त्यांनी शिवाजी महाराजांनी अदभूत कार्य केले तर सावरकरांनी स्वातंत्र्याची विचारधारा काही सिध्दांतातून स्पष्ट केले.तसेच जी नीती शिवाजी महाराजांची होती.तीच नीती स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती.ते विज्ञाननिष्ठा व कुटुंबनिष्ठा वादी होते.ब्रिटिशाची आक्रमणे विकृत होती.त्यांनी भारतातून प्रचंड लूट केलीच पण त्यापेक्षाही घातक म्हणजे त्यांनी भारतीय जनांची बुद्धीच भ्रष्ट केली.सावरकर कुटुंबानी अनेक यातना भोगल्या.त्यामुळे आजच्या समाजाने देशासाठी प्राणाची आहूती देणा-या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून सर्वानी एकसंघ व्हावे.तसेच संत ज्ञानेश्वर,लोकमान्य टिळक व सावरकर यांचे प्रगल्भ विचार व स्वकर्मावरील आणि स्वधर्मावरील त्यांची निष्ठा कशी होती,हे गुरुदेवांनी त्यांच्या सुमधुर वाणीतून अतिशय स्पष्ट शब्दोच्चार आणि अगाध ज्ञानातून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निमित्त होते,दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित स्वर्गीय सौ.रत्नप्रभा प्रभाकर वैशंपायन कला,वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय,नाशिक आयोजित स्वर्गीय सौ.रत्नप्रभा प्रभाकर वैशंपायन यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ६,मार्च मातृदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यावाचस्पती,गुरुदेव मा.श्री शंकर अभ्यंकर यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब यांनी केले.व त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ईशपूजन करुन स्वातंत्र्यवीर सावरकर व आईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्रमुख पाहूण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गव्हर्निग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मँडम व आभार सौ.अमृता कवीश्वर मँडम यांनी केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मँडम व श्री.नितीन सोनवणी सरांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,सर्व वैशंपायन कुटुंब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,असि.सेक्रेटरी मा.सौ.सरला तायडे मँडम,श्री डी.डी.बिटको शालेय समितीचे चेअरमन मा.श्री रोहित वैशंपायन साहेब,वाय.डी.बिटको शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,सरस्वती विद्यालय एम.जी.रोडचे चेअरमन मा.श्री रवींद्र कदम सर,रात्र महाविद्यालयाचे चेअरमन मा.श्री विलास प्रधान सर व प्राचार्या मा.सौ.वेदश्री थिगळे मँडम,सरस्वती विद्यालय,निफाड चेअरमन मा.श्री नंदलाल चोरडिया साहेब,निफाड इंग्लिश स्कूल, निफाड चेअरमन मा.श्री प्रविण ठाकरे साहेब,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री दिनेश जाधव सर,श्री सौ.अमृता कवीश्वर मँडम,श्री अनिल ठाकरे सर,श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मँडम, स्विकृत सदस्य श्री भास्कर कवीश्वर सर,श्री दिलीप निकम सर,संस्था अधिक्षक श्री साहेबराव जाधव सर,जाँईट सेक्रेटरी श्री विलास देवरे सर,श्री बाळासाहेब बैरागी सर,सौ.शितल लिंडायत मँडम,सौ.संगिता चव्हाण मँडम,शाळेच्या अधिक्षिका सौ.सुरेखा कमोद मँडम,सौ.वासंती पेठे मँडम,सौ.मीना वाळूंजे मँडम,शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.जयश्री पेंढारकर मँडम,मा.सौ.सविता कुशारे मँडम,उपमुख्याध्यापक श्री परशराम पुंड सर,श्री ज्ञानेश्वर पाटील सर,श्री.मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षक श्री.बाळासाहेब पाचोरकर सर व श्री राजेंद्र सोमवंशी सर,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
