
मखमलाबाद विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उपस्थित प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.*
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे “जागतिक लोकसंख्या दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संजय डेर्ले, पर्यवेक्षक सुनील पाटील उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षिका मनिषा काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व तसेच भविष्यातील लोकसंख्येचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना पटवून दिले.इ.७ वी ड च्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.त्यातून त्यांनी लहान कुटुंब व मोठे कुटुंब यातील फरक स्पष्ट केला.यामध्ये कु.आस्था चित्ते,कु.ओवी गोसावी,कु.प्रगती सांगळे,कु.स्वरा अहिरे,कु.तृप्ती राजगुरू,कु. अंकिता काकड,कु.श्रेया पिंगळे, कु.समृद्धी बढे, कु.सानवी भंडारी या विद्यार्थिनीनी नाटिका सादर केली.या सर्व विद्यार्थिनींना ज्येष्ठ शिक्षिका योगिता कासार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. दहावी ब चा विद्यार्थी कु.कृष्णा बर्वे याने जागतिक लोकसंख्येचे महत्त्व व लोकसंख्या वाढीवर उपाय सांगितले.या विद्यार्थ्यास ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कारे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका रूपाली शिंदे यांनी अत्यंत सोप्या भाषेत जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पर्यवेक्षक सुनील पाटील यांनी जगातील लोकसंख्येची सद्यस्थिती व त्याचे त्या देशाला होणारे दुष्परिणाम विशद केले. संगीत शिक्षक तुकाराम तांबे व त्यांच्या गीत मंचाने “हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे,ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे” हे सुरेल गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार व मनीषा काकडे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
