
सिन्नर (प्रतिनिधी)विद्येची देवता क्रांतिज्योती, सावित्रीमाई फुले यांच्या १२८ व्या स्मृती दिनानिमित्त महामित्र परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड ,महात्मा फुले महिला महाविद्यालय यांचा वतीने सिन्नर येथे नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्षहार अर्पण करण्यात आला सुत्रसंचलन ऋषिकेश आव्हाड, प्रास्ताविक विजय मुठे आभार अमोल गवारी अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे साविञीमाई फुले या विद्येच्या ख-या देवता होत्या पुर्वी बहुजनांना,स्रीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.लोकांमध्ये समता,बंधुता नव्हती शिक्षणाचा अभाव होता.त्यामुळे महात्मा फुले व क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांनी बहुजनांना स्रीयांना शिक्षण देण्याचे ठरविले.बहुजनांना शिक्षण देण्याला घरातुनच त्यांना विरोध होऊ लागला त्यामुळे त्यांना स्वत:चे घर सोडावे लागले. शाळा काढण्यासाठी उस्मान शेख,नावाच्या उदार व्यक्तिमत्व असणा-या मुस्लिम बांधवाने आपला वाडा महात्मा फुले यांना दिला.तेथे महात्मा फुले व साविञीमाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली.परंतु काही कर्मठ लोकांनी त्यांना विरोध करून म्हणाले की,”धर्म बुडाला…जग बुडणार…कली आला”…असे म्हणायला लागले.त्यांना दगड-धोंडे,माती शेणगोळे फेकुन मारू लागले पण न डगमगता त्यांनी शिक्षण चालुच ठेवले.बहुजन व स्रीया शिकु लागले.बालविवाह प्रथा,विधवांचे केशवपन अशा कु प्रथांना विरोध करून विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा व बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.साविञीमाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची चळवळ आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातुन केला.पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ आली होती माणसे दगावत होती.त्याला प्रतिबंध म्हणुन त्यांनी ससाणे माळावर दवाखाना सुरू केला.प्लेग रोग्यांची सेवा करताना त्यांना प्लेग झाला व १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.या प्रसंगी निलम कर्डक श्रृती लोणारे तृप्ती फडके(कुलकर्णी) नामदेव लोणारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले महामिञ दत्ता वायचळे , महात्मा फुले विद्यालयचे सरचिटणीस नामदेव लोणारे राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, ट्रायबल आर्मी अध्यक्ष अमोल गवारी,निलम कर्डक, तृप्ती फडके,श्रृती लोणारे, नैना कट्यारे,ऋषिकेश आव्हाड मोहिनी इंगळे आश्विनी पाटील शिल्पा गणोरेआदि. उपस्थित होते.
