
मंचर( प्रतिनिधी) नेतवड तालुका जुन्नर येथील जुन्या पिढीतील मातंग समाजाचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले भागवत महादू अल्हाट उर्फ आप्पा यांचे शुक्रवार दिनांक ७/३/२०२५ रोजी दुपारी साडेअकरा वाजता वृद्धपकाळाले दुःखद निधन झाले आहे. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, नातवंडं असा परिवार असून आंबेगाव माझा यूट्यूब चैनलचे संपादक दत्तात्रय नेटके यांचे ते मामा होत. मामांनी जून्या काळात हलाखीच्या परिस्थितीत विविध कामे करून कुटुंब सांभाळले त्यांच्या जाण्याने आल्हाट व नेटके कुटुंबात मनस्वी दुःख झाले आहे, कैलासवाशी भागवत अल्हाट यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक १६/३/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता मुक्ताबाई हॉल नेतवड तालुका जुन्नर या ठिकाणी संपन्न होणार असून दशक्रिया निमित्त ह भ प आत्माराम महाराज बटवाल यांची प्रवचनरुपी सेवा लाभणार आहे. दशक्रिया विधीसाठी सर्व पाहुणे, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अल्हाट कुटुंबीयांनी केले आहे.
