
लासलगाव ( प्रतिनिधी.,भागवत झाल्टे) कांद्याचे भाव 2500 ते 22 शे सध्या सुरू होते ते भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आले त्यामुळे हजारो शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रहार संघटनेने आंदोलन सुरू केले.

प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले , छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख छावा ,क्रांतिवीर सेना येवला तालुका अध्यक्ष प्रफुल गायकवाड , आंदोलन कर्त्यावेळी छगन भुजबळ साहेबांचे कॉल गणेश भाऊ निंबाळकर यांना फोने आला असून माजी मंत्रीछगन भुजबळ कृषिमंत्री व माणिकराव कोकाटे यांनी प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्याशी व शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. कांद्याच्या बाजारभावामध्ये 500 ते 700 रुपयांचा सरासरी बाजार भाव कमी झाला

