
मुळ डोंगरी (प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लाभलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राठोड साहेब. अध्यक्षस्थान स्वीकारून . थोर क्रांतिकारी महिलांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. व सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व विद्यालयातील सर्व शिक्षक भगिनी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शिक्षक महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक मनोज जाधव सर यांनी केले व इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी महिला दिनावर मनोगत सुंदर शब्दात व्यक्त केले. तसेच विद्यालयातील सहशिक्षक कडनोर सर , पगार सर, पाटील सर व शिक्षिका श्रीमती पगार मॅडम यांनी महिला दिनावर विशेष असे मनोगत व्यक्त केले महिलांना आपल्या घरातूनच सन्माना पूर्वक वागणूक दिली पाहिजे व मुलांवर आपण चांगले संस्कार केले तर समाजामध्ये महिलांचे स्थान अग्रस्थानी राहील . हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. जुनिअर कॉलेजचे प्राचार्य बागल सर यांनी महिलांच्या कर्तव्याचे गुणगान गीत गायनातून केले . पवार सर यांनी महिलांचा ८ मार्च या दिवशीच त्यांचा आपण सन्मान न करता सदैव आदर केला पाहिजे. तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक महिला आई ,बहीण पत्नी, मावशी, आजी ,काकू हे आपल्याला सदैव साथ देत असतात . कारण की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. याचे उदाहरण पाहायचे झाले तर राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान पुरुष घडवला . तसेच ज्योतिरावांनी सावित्रीबाई एक महिला असून तिच्यातल्या बघितलेल्या गुणांचा सन्मान करत त्यांना आज समाजात एक आदर्श शिक्षिका म्हणून मानाचे स्थान देण्यास प्रोत्साहन दिले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या यशामागे रमाईचा पण मोठा संघर्ष होता. असे आपल्याला बरेच घटनांमधून पाहता येईल. अशाप्रकारे त्यांनी महिलांचा सन्मान फक्त ८ मार्च दिना पुरताच मर्यादित नसून आपण आपल्या घरातूनच प्रत्येकाने सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंतच महिलांचा सन्मान केलाच गेला पाहिजे. असे सुंदर असे वक्तव्य त्यांनी आपल्या वाणीतून करत महिलांचे महत्व पटवून दिले. तसेच विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांनी अशा काही महिला उपेक्षित आहेत. या महिलांचा नामशेष उल्लेख आपणास कुठे आढळत नाही त्या महिलांची पण कर्तव्याची आणि कर्तबगारीची दखल घेतली पाहिजे असे मनोगत सुंदर अशा शब्दात व्यक्त केले . याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
