
पेठ वडगांव (मारूती जाधव ,प्रतिनिधी) :-. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘ऍग्रो न्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण’ आयोजित आठवे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २०२५’ गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थळ-नवलाई मंगल कार्यालय, फलटण जि. सातारा येथे भरविण्यात येणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्री जगन्नाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली तर श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर अधिपती- फलटण संस्थान, सभापती- विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच मा. श्री. रवींद्र बेडकिहाळ- मा. सदस्य साहित्य व संस्कृती मंडळ, श्री सिताराम नरके- पुणे मा. श्री. धैर्यशील देशमुख अध्यक्ष- म.सा.प. नातेपुते, मा. श्री. दिलीप सिंह भोसले, संस्थापक- सद्गुरु उद्योग समूह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. जेष्ठ साहित्यिक सत्यवान मंडलिक यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरी साहित्य सेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. लेखक सत्यवान मंडलिक यांच्या उत्कृष्ट लेखनातील सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्य कृतींपैकी ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे’ या पुस्तकास हा पुरस्कार सन्मान घोषित करण्यात आला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना साप्ताहिक कराड न्यूजचे मुख्य संपादक दशरथ पवार यांची आहे. न्यू अथर्व पब्लिकन, रुई, इचलकरंजी यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले असून ते जनसामान्य माणसाच्या व वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. लेखकाचे कथासंग्रह, एकांकिका, कादंबरी, कवितासंग्रह अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उत्कृष्ट लेखनाबरोबरच ते व्याख्याते म्हणून ही सुपरचित आहेत. ‘मातोबाचा माळ’ या पुस्तकास मागील वर्षी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर ‘स्वातंत्र्याची 75 वर्षे’ या पुस्तकास सध्या यावर्षी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्कार, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार असे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचा सन्मान प.पु. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज व प.पू. परशरामजी वाघ यांच्या शुभाशीर्वादाने दिला जाणार आहे. तसेच या संमेलनाचे आयोजन श्री प्रकाश गणपतराव सस्ते अध्यक्ष- ऍग्रो न्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण. श्री ज्ञानेश्वर विश्वासराव देशमुख व समिती यांनी तसेच प्रसिद्ध कथाकथनकार श्री विजय काकडे पुरस्कार निवड समिती प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने केले आहे. तसेच सदर साहित्य संमेलन सोहळ्यास सर्वांना उपस्थित राहण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.
