
दुष्प्राचार हा आज एक परवलीचा शब्द आहे.दुष्प्राचार म्हणजे काय तर बहुतेकदा याला बोलक्या भाषेत “फेक न्यूज” म्हणून देखील संबोधतात. कोणत्याही तथ्याचा आधार न देता घेता एखादी गोष्ट घडलेली नसताना देखील त्या गोष्टीला विशेषणे लावून जेव्हा प्रचार व प्रसार केला जातो तेव्हा त्याला दुष्प्रचार म्हणतात.चुकीची माहिती म्हणजे जाणूनबुजून खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे. त्याचा उद्देश एखाद्याला फसवणे किंवा नुकसान पोहोचवणे आहे. पक्षपाती टिप्पण्यांसह फक्त निवडक माहिती शेअर करणे. हा संपूर्ण प्रकार दुष्प्रचार मध्ये मोडतो..राजकारणात समाजजीवनात,व्यक्ती परत्वे याचा अनुभव जीवनात प्रत्येकाला येत असतो..दुष्प्रचारामुळे एखाद्या व्यक्तीचे,देशाचे,फार मोठे नुकसान होत असते..कारण चांगल्या गोष्टीचा प्रचार लवकर होत नाही..मात्र एखादी गोष्ट वाईट रीतीने प्रस्तुत करून प्रचार व प्रसार जेव्हा केला जातो तेव्हा ती गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरते…जसा आगीचा भडका उडतो तसा.एक ठिणगी जरी लागली तर आग भडकते..तसेच दिशाभूल करणाऱ्या गोष्टींचे आहे..दिशाभूल करणाऱ्या गोष्टी नको तिथपर्यंत पोहोचतात…अशा गोष्टींना प्रचारक भरपूर मिळतात.एखाद्या व्यक्ती देशाची यशस्विता, चांगले कार्य, विधायक कार्य विरोधकांसाठी असूया निर्माण करणाऱ्या ठरतात.विरोधक स्वतः व काहीच करत नसतात. पण दुसऱ्याची ख्याती त्यांना नको असते…अशी व्यक्तीने व देशाने केलेली प्रगती यामुळे ते सतत विवंचनेत असतात.एखादी व्यक्ती,देश स्वबळावर स्वतःची ख्याती मिळवून घेत असते.यात त्यांचे स्वतःचे योगदान महत्त्वाचे असते.ही बाब विरोधकांना माहीत असते पण..स्वतःची योग्यता नसल्याने अशी व्यक्ती स्वतःच्या यशा पर्यंत पोहोचत नसते. अशांजवळ एकच शस्त्र असते.ते म्हणजे विरोधकांना नामोहरम करणे..विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रोपोगँडाचा वापर करणे.अशांकडून दुष्प्रचाराचा मोठ्या प्रमाणावर केला जातो..विशेषतः राजकारणात,समाज कारणात याचा पदोपदी अनुभव येत असतो. राजकारणात विरोधनांना बदनाम करण्यासाठी खोटा प्रचार केला जातो.ज्याला फेक नेटिव्ह म्हणतात. भारतीय राजकारणात याचा पदोपदी अनुभव येत आहे.एडॉल्फ़ हिटलर हा जर्मनीचा तानाशाह होता. तो २० वीं सदीच्या सर्वात शक्तिशाली आणिकुख्यात तानाशाहांपैकी एक होता. प्रथम विश्व युद्धात जर्मन सेनेत सेवा केल्यानंतर, हिटलरने नाज़ी पार्टीच्या रैंकोंमध्ये प्रगती केली. एडॉल्फ़ हिटलरने प्रचारासाठी जो तंत्र वापरला, त्याला गोबेल्स तंत्र म्हणतात. या तंत्राच्या माध्यमातून हिटलरने जर्मनीमध्ये विरोधी विचारांचा समूळ नाश केला होता.एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी.हे अॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचं सूत्र होतं, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिलं जातं. असं म्हटलं जातं की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जनमानसात ज्यूंविरोधात मत तयार करण्याचं काम प्रचार मंत्रालयाने केलं. तर अंदाजे ६० लाख ज्यूंचा नरसंहार प्रत्यक्षपणे याच प्रचार तंत्राने करण्यात आला.त्यामुळे ज्यू लोकांच्या नरसंहाराला जितका हिटलर जबाबदार आहे, तितकंच जबाबदार गोबेल्सचा प्रमुख हेनरिच हिमलर आणि प्रचार मंत्रालयाचा प्रमुख जोसेफ गोबेल्स यांनाही धरलं जातं.नाझी पक्षाचा प्रचारक, संपादक, प्रचारमंत्री, युद्धमंत्री आणि शरणागती जाहीर करणारा जर्मनीचा एका दिवसाचा चॅन्सलर, अशा विविध भूमिका गोबेल्सनं बजावल्या. त्यामुळे गोबेल्सला २०व्या शतकातील सर्वांत भयंकर युद्ध गुन्हेगारांपैकी एक म्हटलं जातं.ज्यांचा नायनाट करण्यासाठी व विरोधकांना शमविण्यासाठी हिटलरने गोबेल्स तंत्राचा वापर केला.संपूर्ण जर्मन देशाला युद्धात ढकलले.शेवटी नाझी जर्मनीचा पराभव झाला. व हिटलरला आत्महत्या करावी लागली.हिटलरचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला..विरोधकांना नामहरणं करण्याच्या नादात स्वतः हिटलरने आत्महत्या केली..प्रोपगंडा आणि सेन्सरशिप ही दोन साधनं वापरून नाझी पक्षाने लोकांचं ब्रेनवॉश केलं. या प्रचाराच्या माध्यमातून हिटलरची एक आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आली होती.आजही आपल्या समाजात,अवतीभवती व राजकारणात हिटलर आहेत.अशांपासून सावध राहण्याची गरज आहे.भारतीय राजकारण देखील विरोधी पक्षाला,नेत्यांना बदनाम करण्यासाठी दुष्प्राचार या गोबेल्स नीतीचा अवलंब केला जात आहे..याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकी दरम्यान आला होता.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजविरूढ विरुद्ध फेक नरेटिव्ह सेट केले होते.लोकसभा निवडणुकीपासून राज्यात फेक नरेटिव्ह याचा अनेकदा उल्लेख करण्यात आला होता. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही फेक नरेटिव्ह मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. नरेटिव्ह पसरवणाऱ्यांकडून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातल्या लोकांमध्ये व तरुणांमध्ये गैरविश्वास निर्माण केला जातो.दुष्प्रचारामुळे अर्थात फेक नेरेटीव्हचा फटका केंद्रात भाजपला बसला.केंद्रात भाजप अल्पमतात आले.मित्र पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात भाजपाने सरकार बनविले.आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील दुष्प्रचाराचा अवलंब होत असतो. एखाद्या राष्ट्राची प्रगती, त्या देशाने केलेला विकास विरोधी राष्ट्रांना खुपत असते. पाकिस्तान नेहमीच भारताचा दुष्प्रचार करत असतो. खोटी माहिती जागतिक स्तरावर पसरवित असतो. पाकिस्तानने अनेकदा युनो सारख्या जागतिक मंचावरून भारताविरुद्ध विशेषतः काश्मीर संदर्भात दुष्प्रचार केलेला आहे.पाकिस्तानने भारत विरुद्ध दुष्प्रचार साठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले आहेत. त्यात राजधानी इस्लामाबादमधील विदेश मंत्रालयाच्या प्रवक्तांचे बयान, संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)मधील पाकिस्तानच्या राजदूतांचे बयान यांचा समावेश होतो. कलम कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानने जागतिक मंचावरून भारत विरोधात दुष्प्रचार केला होता अजूनही पाकिस्तान दुष्प्रचार करत आहेत.जम्मू आणि काश्मीर मुद्द्यावर राजनैतिक आघाडीवर पराभूत झालेला पाकिस्तान अजूनही सरकार, सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारे प्रचार करण्यापासून थांबत नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पाकिस्तानने दुष्ट प्रचाराच्या मदतीने काश्मीर मुद्द्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यावेळीही २ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान जनमत चाचणी घेण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशाचा ढाल म्हणून वापर करून काश्मीर मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम चालवली.भारताने पाकिस्तान जोडमेदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे.व्यक्ती जीवनात दुष्प्रचाराचा अनुभव अनेकांना येत असतो..फेक नेटिव्हमुळे अनेकांची नाहक बदनामी होत असते.मोठ्या पदावर असणारी,ख्यातनाम व्यक्ती,समाजसेवक अशा व्यक्तींना याचा अनुभव पदोपदी येत असतो.दुष्प्रचारामुळे अनेकांचा बळी देखील गेलेला आहे..सत्य माहित नसेल ,कोणत्याही गोष्टीत तथ्य नसले तर अकारण कोणाही विरुद्ध खोटा प्रचार करू नये.खोटा प्रचार करणाऱ्याला याची किंमत चुकवावी लागते..जसे दुसऱ्याचे वाईट कराल तसे स्वतःचे देखील नुकसान होत असते. खोट्या माहितीचा प्रसार केल्यामुळे अनेकांवर आज अब्रू नुकसानीचा सामना करावा लागत आहे.काहींना नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागली आहे काहींनी याची फार मोठी किंमत देखील चुकविलेली आहे .दुष्प्रचार करणाऱ्यांचा हिटलर व्हायला फारसा वेळ लागत नसतो.तेव्हा दुष्प्रचारापासून सावध राहिलेले बरे..९५६१५९४३०६
