
लेखक:-शंकर नामदेव गच्चे (एम.ए.बी.एड्.) जि.प.प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर जि.नांदेड मोबाईल.नंबर-८२७५३९०४१०

शंभुराजांना पकडुन जेव्हा औरंगजेबासमोर आणले, तेव्हा तो औरंगजेब शिवाजी महाराजांच्या मुलाला पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने मारून घायल झालेलं शरीर पण तरीही संभाजी महाराजांची मान ताठच होती. नजर तशीच त्या नजरेकडे पहात औरंगजेब विचार करू लागला तो हाच का संभा ?? ज्याने आलमगिराची ९ वर्ष झोप उडवली.रानोमाळ हिंणडवलं. माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या. त्यांनाच ह्या संभान अस्मान दाखवलं. माझी कैक लाखांची सेना लांबून एखाद्यानं पाहिली तर छातीत धडकीच भरेल एवढे अफाट मनुष्यबळ पण याच संभाजीने पार वाट लावली त्यांची. हाच का तो संभाजी? अरे त्या शिवाने माझे किल्ले जिंकले, प्रदेश जिंकला पण कधी बुऱ्हानपूरला हात नाही घातला. पण हा संभाजी गादीवर आला आणि सगळ्यात आधी त्याने बुर्हाणपूर लुटलं,भागानगर जाळून टाकलं. एक कोटींचा खजिना त्याने लुटून नेला. साडे आठ वर्षाचा असताना हा आला होता शिवाबरोबर आग्र्यात त्यावेळी मी त्याला विचारलं होतं क्यों रे संभा, तुम्हे डर नही लगता हमारा?? तेव्हा तो म्हणाला होता, हमे किसीका डर नही लगता,पर हमारी वजहसे सबको डर लगता है! हाच तो संभाजी पुरे हिंदुस्तान के आलमगीर होना चाहते है हम पण माझ्या ह्या महत्वकांक्षेलाच यांनी छेद दिला.ह्याची माणसं तशीच बेडर, धाडसी, पराक्रमी तो नासिकचा किल्ला ‘रामशेज’ किल्ल्याच्या खाली माझी ३०-४० हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी सहाशे माणसं पण सहा वर्ष अजिंक्य ठेवला किल्ला त्यांनी. माणसाच्या हृदयात काय पेरतो हा कुणास ठाऊक ?मी इंग्रजांना ह्याच्या विरुद्ध चिथावलं, पोर्तुगीजांना ह्याच्या विरुद्ध उभं केलं.सिद्दीला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवत्त केलं. पण सगळ्यांच्या उरावर पाय देऊन हा उभा राहिला. इंग्रजांना चारीमुंड्या चीत केलं. पोर्तुगीजांची हाडे खिळखिळी केली.जंजिर्याच्या सिद्दीचे कंबरडेच मोडले त्याने. माझे कैक लाखाचे सैन्य,माझे नातलग,माझे शहजादे सगळ्यांवर जबरदस्त जरब बसवली ह्याने. माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार हे पण गृहीत धरलं होतं. मद्रास,पाषाणकोट ,तंजावर, जंजिरा प्रत्येक जागी हा आणि ह्याची माणसे आहेतच.जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी जणू हाच दिसत होता मला. कसल्या मिट्टीचा बनला आहे हा? औरंगजेब आसन सोडून उठला आणि त्या खुदा चे आभार मानायला जमिनीवर गुडघे टेकून बसला. ‘ये खुदा आखीर तुने वो दिन दिखाया ….. शुक्रगुजार है हम तेरे.त्याच वेळी शंभूराजे कवी कलशाला म्हणतात, “काय कविराज ह्या अशा वेळी सुचतीय का एखादी कविता? आणि तत्क्षणी कविराज बोलते झाले, ‘राजन तुम हो सांझे,खूब लढे हो जंग,देख तुम्हारा प्रताप मही,तखत त्यजत औरंग’ ह्याचा अर्थ असा: राजन काय लढलात आपण ? काय तुमचे ते शौर्य, तुमचा प्रताप पाहून हा औरंगजेब स्वतः सिंहासन सोडून तुमच्यासमोर गुडघे टेकून बसला आहे.मग सुरू झाले अत्याचाराचे पाशवी खेळ, ४२ दिवस सतत, सलग, क्षणाक्षणाला भीमा इंद्रायणी सुद्धा आसव गाळू लागल्या. ह्या अत्याचारांच्या शृंखलेत एक दिवस असाही आला जेव्हा मियाखान ज्याच्या दोन्ही मुलींची लग्ने स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली होती, तो आला. पाहिलं त्यानं मराठ्यांच्या राजाची झालेली दुरावस्था. डोळे काढलेत, हाता पायाची बोटे छाटलीत,रक्त फक्त रक्त ठिबकतय त्यातून…चामडी सोलून काढलीय पूर्णांगाची. त्यावर बसणारे किडे,माश्या पहिल्या त्यांचा होणारा त्रास बोलून दाखवायला वाचाच राहिली नव्हती.जीभ छाटली होती माझ्या राजाची. तो मियाखान अशाही परिस्थितीत विचारता झाला शंभूराजांना ‘राजे वाचवू का तुम्हाला?’ घेऊन जातो तुम्हाला स्वराज्यात’ आवाज ओळखीचा वाटला तशी शरीराची तगमग धडपड सुरू झाली.

हात पाय हलायला लागले, उठून बसायचा एक केविलवाणा प्रयत्न आणि तोही स्पशेल फसला. अत्याचार सोसून जर्जर झालेला देह साथ देईनासा झाला आणि त्यांची अशी अवस्था पाहून पुन्हा मियाखान बोलला’ नको राजे,नकोच तुम्हाला हा असा स्वराज्यात घेऊन गेलो तर तिथली रयत माझ्यावर छी थू करेल, मलाच मृत्यूच्या दाढेत लोटून देईल विचारेल मला ज्याने तुझ्या मुलीचे लग्न स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली त्या त्या आमच्या राजाची अशी अवस्था झाल्यावर त्याला आमच्याकडे घेऊन येताना तुला लाज नाही वाटली का ? नाही सहन होणार मला त्यांच्या आरोपांच्या फैरी.. त्यापेक्षा तुम्ही येथे मेलेलंच बरं..हे शब्द ऐकताच साखळदंडांनी जखडलेल्या देहाला हिसके बसायला सुरवात झाली. त्यांच्या आवाजाने त्या भयाण रात्रीची शांतता भंग पावली. चोरपावलांनी शंभूराजाला पाहायला आलेला मियाखान मृत्यूच्या कराल दाढेत अडकल्यासारखा जागच्या जागीच थिजून थरथरायला लागला.मशाल विझली आणि त्यातून ऐकू येऊ लागला साखळदंडांचा संथ आवाज. काही वेळानंतर तो आवाजही थांबला.संभाला काय झाले हे पाहायला आलेल्या एका पहारेकरी हशमाला तो रक्तात लोळागोळा होऊन पडलेला शंभूचा देह हातातल्या मशालीच्या उजेडात दिसला. तो पाहिल्यावर एक विषारी फुत्कार टाकून तिथे असलेली एक मशाल पेटवून तो हशम शंभूराजांपासून निघून गेला. अंधारात लपून बसलेला मियाखान काही वेळाने बाहेर पडला. साखळदंडांचा आवाज त्याला राजापर्यंत यायला भाग पाडत होता. तो आला.. आला… जवळ आला.. समोरच्या मशालीच्या उजेडात झालेली हालचाल कशासाठी होती हे शोधू लागला आणि तिथल्याच एका दगडी शिळेवर बोटे तुटलेल्या हाताने शंभूराजांनी लिहीलेले शब्द वाचून पुरता शहारला.. ती वाक्य होती ‘वाचवाच मला खांसाहेब, माझ्या नुसत्या जिवंत असल्याने सुद्धा औरंगजेब बादशहा खंगून खंगून मरून जाईल. वाचवाच मला खाँसाहेब’ मरणाच्या दाढेत पडलेला असून सुद्धा अरे मृत्यू देहावर विचारांवर थैमान घालत असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी जगायची, रयतेसाठी लढाईची, अशाही परिस्थिती असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून भारावून गेला .मियाखान एखाद्या लहान बाळासारखा मुसमुसून रडायला लागला.अल्लाहकडे हात पसरून बोलायला लागला. “इन्सानियत का सच्चा वारीस आज तेरे करीब आ रहा है,उसपे अपनी रहमत बरसा,तेरे जन्नत के दरवाजे इस पाकदिल इंसान के लिए हमेशा खुले रख”.९ वर्ष सलग ९ वर्ष इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल अशा एक नाही तब्बल बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, सातसतक, नखशिखा, बुद्धभूषणकार झालेला नृपशंभो आम्हाला कुणी सांगितलाच नाही, दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करुन सरकारातून पैसे आणि बी-बियाणे पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा आम्हाला कोणी सांगितलाच नाही. तब्बल १४० लढाया करून एकही लढाई पराभूत न झालेला रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही. स्वतःच्या पत्नीला स्त्री सखी राणी जयती असा किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री-पुरुष समतेचा पाया घालणारा, मुलकी कारभार सोपविणारा सुधारक कुणी आम्हाला कुणी सांगितलाच नाही. वडिलांच्या स्वराज्य मंदिरावर प्राणांची आहुती देत कळस चढवणारा, सर्जा संभाजी आम्हाला कोणी सांगितलाच नाही आमच्या पुढे कथा, कादंबरी, नाटक, पाठ्यपुस्तक यांच्यातून रेखाटला तो व्यसनी आणि मद्यधुंद संभाजी. असं का झालं ? याचं उत्तरं शोधण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांना इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ह्या तुकोबारायांच्या पंक्तीला पुरून उरलेला सज्ञान कर्ता पुत्र सर्जा संभाजी आम्हाला कोणी सांगितलाच नाही. आमच्या पुढे उभा केलेला संभाजी हा रगेल आणि रंगेल असाच संभाजी कथा, कादंबरीकाराने उभा करून काय साधलं ? हेच आम्हाला कळत नाही. रामशेजसगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्ष कमी मनुष्यबळावर झुंजता ठेवणारा झुंजार रणमर्द आम्हाला कुणी सांगितलाच नाही. रयतेला छळणार्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून फुल बांधणारा इंजिनिअर आम्हाला कुणी सांगितलाच नाही. राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडीलधाऱ्यांची मान आणि इज्जत राखणारा रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही. बाणांच्या वर्षावात मनुष्यहानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॕकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा रणमर्द आम्हाला कोणी सांगितलाच नाही. मराठ्यांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, धाकले धनी, संभाजी महाराज याचा जवळचा मित्र रायाप्पा एक महार ज्याला सोडवायला तयार झालेला मियाखान एक मुसलमान आपल्या धन्याच्या मरणाची वाट आपण शत्रूला दाखविली म्हणून दहा-बारा वर्षाच्या वयात पश्चाताप करीत शत्रूलाटेवर तुटून पडत त्यांच्या छावणीतले डेरे,दांडे जाळत मृत्यू जवळ करणारी ती ८ धनगर पोरं आम्हाला कोणी सांगितलीच नाही. मलकापुरात दहा हजाराची राखीजिंक्य फौज तयार करून देणारा कवी आणि कवित्व जपणारा राजधानी रायगडावरील राजांच्या शञूंना अस्मान दाखवणारा,राजांचा श्वास असणारा कवी कलश आम्हाला कोणी सांगितलाच नाही.

