
नांदगाव (प्रतिनिधी )नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘के.जी.च्या सर्व विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न. दिनांक 8 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम रेनबो मुख्याध्यापिका सौ.स्मिता सुर्यवंशी मॅम यांच्या नेतृत्वाखाली या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा.मॅनेजमेंटने सर्व विद्यार्थी व पालक समवेत सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता सुर्यवंशी यांनी मा.मॅनेजमेंट श्री.संजय बागूल व सौ. सरिता बागूल यांचा सत्कार केला.रेनबो स्कूल विद्यार्थ्यांचा माँटेसरी चा सुरेख डान्स केला.लिटिल स्टार स्कूल विद्यार्थ्यांचा यू.के.जी.चा सुरेख डान्स केला.

सर्व विद्यार्थ्यांनी स्वताची ओळख व इंग्लिश मौखिक वाक्य सादर केले.सर्व विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा ड्रेस घालून मा.मॅनेजमेंटच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आली होती. ड्रेस मध्ये चिमुकले खूप गोड दिसत होती हे प्रत्यक्ष पालक अनुभवत होती. ह्या छोट्या चिमुकल्याच्या गोड सोहळ्याने पालकांचे डोळे दिपून गेले होते. सौ.शीतल जगधने व सौ.पुजा पाटील या पालकांनी विद्यार्थ्यांचीप्रगती, आत्मविश्वास, कमी झालेली भिती व दडपण याबाबत शिक्षकांचे व स्कूलचे कौतुक केले.मा.मॅनेजमेंटने जागृत शिक्षण प्रणालीविषयी विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.एडना फर्नाडिस यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी अतिशय मेहनत घेतली.
