
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४१ वा दिवस
ज्या देशातील सर्वसाधारण जनतेत शिक्षण, विद्या, संघटनशक्ती, समाजशक्ती वगैरेची जितकी वाढ होईल, तितक्या प्रमाणात तो देश उन्नत व प्रगत होईल. आपल्याला जर पुन्हा एकदा नव्याने उठावयाचे असेल तर आपणही तोच मार्ग चोखायला पाहिजे. सर्वसाधारण जनतेत विद्येचा प्रसार केला पाहिजे. शिक्षणाचा फैलाव केला पाहिजे. सर्वसाधारण जनतेला शिक्षण द्या, त्यांची शैक्षणिक व सामाजिक उन्नती घडवून आणा राष्ट्रनिर्मितीचा हाच एकमेव उपाय आहे. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १९ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ सोमवार दि. १० मार्च २०२५
★ आमलकी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १८९७ स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसेविका, “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन
★ १९२९ सुप्रसिध्द मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन
★ १९५९ पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांचा स्मृतीदिन
★ १९७१ कोकणचे गांधी ही उपाधी असलेले सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचा स्मृतिदिन
★ १९९९ मराठी भाषेतील जेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ “कुसुमाग्रज” यांचा स्मृतीदिन.


