
नांदगाव (प्रतिनिधी).स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती..स्त्री म्हणजे नावीन्याचा ठसा, स्त्री म्हणजे घराच घरपण..स्त्री म्हणजे महान कार्य होय..दिनांक 8 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व शालेय शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिवस याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मा.मॅनेजमेंटने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण एक मिनी सरप्राईज या दिनानिमित्त ठेवण्यात आले होते. स्कूलमधील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचार्यासाठी मानाचा फेटा बांधून त्यांचे स्वागत वाद्यसंगीत सह करण्यात आले. सर्व महिलांनी सरस्वती पूजन करून स्कूल मध्ये प्रवेश केला. सर्व महिला स्थानापन्न झाल्यानंतर स्त्री परिभाषा व स्त्री संघर्ष प्रेरणादायक विचार मा.मॅनेजमेंट श्री.संजय बागूल व सौ. सरिता बागूल यांनी मांडले.

यानंतर कु.स्वप्नाली शिंदे ,सौ. धनश्री काकळीज, श्रीमती. मेघा शिरसाट, सौ.वर्षा नगे,सौ. विजेता परदेशी, सौ.सुरेखा खैरनार ह्या सर्व महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. मा.मॅनेजमेंटने सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना शीतपेय देण्यात आले. सर्वानी शेवटी मनसोक्त डान्स केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राहुल उपाध्ये यांनी केले.हाकार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय शिक्षकांनीअतिशय मेहनत घेतली.
