
नासाका विद्यालयात महिला दिनी आयोजित सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह सन्मानार्थी शिक्षिका.
नाशिकरोड:-पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी यांच्यासह शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्या मंदिरच्या सर्व शिक्षिकांसह पोषण आहार सेविका सुलोचना जाधव यांचा ग्रंथभेट आणि लेखणी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सृष्टी सरोदे, धन्वंतरी गायधनी, वेदिका आडके, ईश्वरी आडके, धनश्री सानप या विद्यार्थ्यांनी भाषण केले. शिक्षिका जयश्री आगळे यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अरुण पगार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन केले.
