
प्रिंप्राळे.(प्रतिनिधी चिंतामण सदगीर ,सर )पिंपराळे येथील रहिवाशी श्री. ज्ञानेश्वर सदगीर ( ह. मु. पिंपळगाव बसवंत ) यांच्या धर्मपत्नी तथा खंडाळवाडी ( वडनेर भैरव ) येथील माहेरवासीण आणि बी. के. कावळे माध्यमिक विद्यालय – राजारामनगर ( दिंडोरी ) येथील उपक्रमशील तंत्रस्नेही विद्यार्थीप्रिय महिला शिक्षिका सौ. कविताताई बेंडके / सदगीर मॅडम यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल जागतिक महिला दिनी “नारीशक्ती गौरव”पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कविता बेंडके मॅडम यांना यापूर्वीही “ऑनलाईन प्रश्नमंजुषा प्रथम विजेत्या तसेच कोरोना काळातील त्यांच्या विशेष शैक्षणिक कामाबद्दल “उत्कृष्ट कोरोना संघर्ष योद्धा ” तसेच भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उत्कृष्ट “शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे खंडाळवाडी येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी स्वर्गीय बाबुराव बेंडके यांच्या त्या सुकन्या आणि उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार विजेते ग्रामविकास अधिकारी श्री. कैलास बेंडके सुप्रसिद्ध गायनचार्य हभप श्री. सुभाष महाराज बेंडके लासलगाव तेथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुरेखा बेंडके मॅडम नगरसूल येथील अजिंक्य तारा आश्रशाळेच्या मुख्यध्यापिका सौ. मंदा चौधरी / बेंडके मॅडम आणि माळमाथा (खंडाळवाडी) येथीलअंगणवाडी सेविका सौ. सरला टेकनर यांच्या कविता ताई बेंडके या भगिनी आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे .
