
नांदगाव (प्रतिनिधी)*नांदगांव शहरातील जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव सहेली या सामजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावतानगर येथिल शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिष्ठांत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस मुला मुलीनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर सरस्वती देवतेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते आलेल्या सर्व मानवेतराचे स्वागत व सत्कार करण्यात आला. जायंटस ग्रुप या सामाजिक संस्थेच्या बाबतीत सविस्तर . माहीती देण्यात आली ग्रुपचे अध्यक्ष श्री.सोमनाथ दुसाने व अध्यक्षा सौ. वैशाली दुसाने यांचे शुभ हस्ते पाटी, पेन्सिल इ.साहित्य वाटण्यात आले त्याच बरोबर चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आले मनोगत व्यक्त केले. मा.मुख्यधापिकांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.* *या कार्यकमास ग्रुपचे अध्यक्ष व अध्यक्षा वैशाली दुसाने यांचे बरोबर सुमित गुप्ता ,बळवंत शिन्दे ,रामनिवास करवा, भारती बोरसे ,पुष्पा दुसाने, शुकुंतला शिन्दे मुख्याध्यापिका सौ. ज्योतीताई पाटील , दीपिका मोकळ, शाईन शेख, वेदना मोकळ, कल्पना मोकळ व इतन सदस्य उपस्थित होते.*
