
नाशिक (प्रतिनिधी )यशवंत पाटील यांना साहित्य शिरोमणी पुरस्कार जाहीरसाहित्यकणा फाउंडेशन संस्थेच्या वतीने दरवर्षी आध्यात्मिक लेखनासाठी साहित्य शिरोमणी पुरस्कार दिला जातो, या पुरस्कारासाठी यशवंत पाटील यांची निवड केली असल्याचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी जाहीर केले.साहित्यकणा फाउंडेशन व भावसुमन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २९ जूनला कॅनडा कॉर्नर परिसरातील समर्थ मंगल कार्यालय येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, यात चित्रा बाविस्कर, माधुरी अमृतकर, सीमाराणी बागुल, माधुरी वरुडकर, अलका कोठावदे, कविता कासार, सोमनाथ पगार, गंगा गवळी- पवार, प्रशांत आंबरे आदींना साहित्य-साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात असल्याचे सचिव विलास पंचभाई सांगितले.
