
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती ए. एम. नेमणार होत्या. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे सर्व संचालक, विश्वस्त, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निंबाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन ए .एम. साळुंके यांनी केले,तर आभार एन .एस. अहिरे यांनी मानलेत.
