
दिनेश आंबेकर -ग्रामदार मंडळ बरवाडापाडा येथे आज अंगणवाडी केंद्र – बरवाडापाडा या ठिकाणी मा.सुधींद्र नखाते(वेदांता हॉस्पिटल) यांच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून तसेच अविनाश तुकाराम कामडी यांचा प्रयत्नातून लहान मुलांना पार्टी व पेन्सिल याचं वाटप करण्यात आल. या कार्यक्रमासाठी ग्रामदन मंडळ बरवाडापाडा सदस्य सौ.प्रतिमा अनिल खरपडे व सौ.मनीषा विनोद मौळे या उपस्थित होत्या.तसेच अंगणवाडी सौ.लताताई,खेत्रीपाडा अंगणवाडी सौ.मीनाताई,मदतनीस सौ.सुरेखताई गावातील माता-भगिनी आणि लहान मुलं उपस्थित होते. वाटप कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि शान पद्धतीने पार पडला.मा.नखाते साहेबांचा आभार मानून,शेवटी चॉकलेट,बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
