
. सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४० वा दिव
जो तो आपल्याच कर्मांची शुभाशुभ फळे भोगत असतो हा शाश्वत सिद्धांत आहे. कधी कधी आपल्याला वाटते की, असे नसेल. परंतु दूरगामी विचार केला तर सिद्धांताची सत्यता पटते. एखादा मनुष्य आयुष्यभर संपत्तीच्या मागे लागतो. हजारो लोकांना तो फसवितो. मग त्याचेच जीवन त्याला असह्य होऊन बसते. आपण सुखसोयींची अनेक साधने गोळा करतो. एखादा माणूस जगातील सर्व ग्रंथसंपत्ती आपल्या ग्रंथालयात आणील; पण तो जे वाचील तेवढेच त्याला लाभेल. ही त्याची योग्यता त्याच्या कर्माने ठरत असते. आपल्याला काय लाभेल, त्यातील आपण काय ग्रहण करू शकू हे सारे आपले कर्मच ठरविते.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. ९ मार्च २०२५
★ १८६३ गायक, नट, नाटककार “समाजराव” लक्ष्मण बापूजी कोल्हटकर यांचा जन्मदिन
★ १९३० संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. युसूफखान महंमद तथा यु. म. पठाण यांचा जन्मदिन
★ १९३१ काश्मीर राजघराण्याचे वंशज माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते डॉ. करणसिंग यांचा जन्मदिन.
★ १९५६ संयुक्त राष्ट्र संघटनेचे उच्चायुक्त, सुप्रसिध्द लेखक, स्तंभलेखाकार, अर्थतज्ञ, खासदार केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते शशी थरूर यांचा जन्मदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


