
सिन्नर प्रतिनिधी – डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील शिक्षकांसह ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले होते. क्रीडाशिक्षक शिवाजी गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व, फायदे ,योगदिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगा केल्यास तुम्ही शारीरिक आजारापासून दूर रहाल .

यावेळी प्राचार्य उगले म्हणाले की, योगामुळे शारीरिक व मानसिक शक्ती वाढवण्यास मदत होते. मन संतुलित व प्रसन्न राहुन मनाची एकाग्रता वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावेत असे प्राचार्य उगले यांनी केले. क्रीडा शिक्षक एस .बी. गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करून घेतली. त्यांना विद्यार्थी सार्थक दिवे , कृष्णा बर्वे ,प्रणव पावसे, तूषार सदगीर, ईश्वर पडवळ आदींनी सहकार्य केले.आभार पर्यवेक्षक उल्हास पवार यांनी मानले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत,शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेऊन योगासने केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ पगार, सोमनाथ गिरी , रामदास वारुंगसे ,सोमनाथ माळी , सीमा गोसावी, डी. ए.रबडे,के.एस.शिंदे, सुनिल ससाणे,रेवणनाथ कांगणे, रवि गोजरे, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
