
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात योगाचे प्रात्यक्षिक करताना योग गुरु प्रभाकर पवार, प्राचार्य रायभान दवंगे, विद्यार्थी व सेवक
कसबे सुकेणे (प्रतिनिधी)- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात अभिनव, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तेरावा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते चालू वर्षीच्या योगदानाचे थीम एक पृथ्वी एक आरोग्य हे असून संपूर्ण भारतासह जगातील काही देशात जागतिक योग दिन साजरा होत असून व्यक्तीचे आरोग्य व सुदृढ भारत यासाठी योगदानाचे विशेष महत्त्व असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्राचार्य दवंगे यांनी विद्यार्थ्यांना दिली यावेळी करंजगाव येथील गुरुकुल विद्यानिकेतन चे योग गुरु प्रभाकर पवार व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिन साजरा करण्यात आला यावेळी जवळपास 34 प्रकारचे योग प्रकार घेण्यात आले या योगामध्ये विद्यालयातील 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी क्रीडा शिक्षक दिलीप काळे व बाळासाहेब गडाख यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले याप्रसंगी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षक राजेश खताळ, अभिनव मुख्याध्यापक राहुल मोगल, कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा सचिन भंडारे आदींसह विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यांनी योग दिनात भाग घेत योगाचे प्रात्यक्षिक केले सूत्रसंचालन दिलीप काळे यांनी तर आभार बाळासाहेब गडाख यांनी मानले.
