
नाशिक रोड (प्रतिनिधी) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत शनिवार दि.२१/०६/२०२५ रोजी २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे यांनी आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्व सांगतांना योगाचा मुख्य उद्देश लोकांना योगाच्या फायद्यांबद्दल जागरूक करणे आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवून मनावरही चांगले संस्कार करता येतात.तसेच मानसिक,शारीरिक आणि भावनिक संतूलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे असे सांगितले.उपमुख्याध्यापक श्री. राजेंद्र सोमवंशी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन सुत्रसंचालन व नियोजन सरांनी केले.योगशिक्षक श्री किसन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके घेण्यात आले.

विद्यार्थिंनींनी योगसाधना केली.या कार्यक्रमासाठी शिक्षक
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे ,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे ,उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री. मिलिंद कोठावदे ,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल ,सौ.भारती चंद्रात्रे ,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थिंनी उपस्थित होते.फलक लेखन सौ.सायली मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री.गणपत मुकणे,सौ.मेघना देशपांडे,सौ.चेतना टोपले , ग्रंथपाल किसन बागुल ,शालेय कर्मचारी सुरज काळे ,गायकर , दत्ता गायकवाड ,श्रीमती लता निरभवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
