
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४३ वा दिवस “योग म्हणजे अंतरात्माला परमात्माशी जोडणे होय,” भारतात आम्ही ज्याला ‘योग’ वा एकत्वाची अनुभूती म्हणतो तिच्याच द्वारे धर्माच्या अंतिम लक्ष्याचा लाभ होतो. कर्मयोग्याच्या दृष्टीने हा योग मनुष्य व मनुष्यजाती यांच्या एकत्वाची अनुभूती होय. राजयोग्याच्या दृष्टीने हा योग जीव व ब्रम्ह यांच्या एकत्वाची अनुभूती होय. भक्तीयोग्यांच्या दृष्टीने तो प्रेमस्वरुप भगवान व भक्त यांच्या एकत्वाची अनुभूती होय आणि ज्ञानयोग्यांच्या दृष्टीने तोच अनेकत्वातील एकत्वाची अनुभूती होय. एकाच योगाची भिन्न भिन्न मनोरचनेनुसार ही विभिन्न रुपे होत. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १ आषाढ शके १९४७
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १०/११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २१ जून २०२५
★ योगिनी स्मार्त एकादशी
★ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर
★ उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस.
★ १९४० राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतीदिन.
★ आंतरराष्ट्रीय संगीत दिन.
★ २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन.
★ ‘योग भगाये रोग’ निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा.🧘♂️🧘♀️🧘🧘♂️🧘♀️🧘🧘♂️🧘♀️🧘🧘♂️🧘
