
बारागाव पिंपरी.(प्रतिनिधी) शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. समाजाचा तो आरसा असतो, ज्ञानाबरोबरच संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात*. *श्री दिलीप उगले सरांनी आपल्या सेवा काळात हे काम प्रामाणिकपणे बजावले असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी तथा साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोडचे प्रशासक श्री गणेश फुलसुंदर साहेब यांनी केले. बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री दिलीप उगले यांच्या 32 वर्षाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक बागुल , पर्यवेक्षक श्री उत्तम उगले ,जुनिअर कॉलेज इन्चार्ज श्री भाऊराव गुंजाळ, सिन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कैलास सांगळे, केंद्रप्रमुख श्री इरफान पटेल, सरपंच सौ संध्या कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री केरू पवार, माजी प्राचार्य श्री वाडेकर सर, श्री पंढरीनाथ शेळके, पिंपळगाव निपाणी चे मुख्याध्यापक श्री धनंजय पाठक, राजाराम मुंगसे, दत्ता वायचळे, प्रा श्री डी. एस. शिंदे सर, श्री पी. बी. चतुर सर, श्री विठ्ठल राजे उगले माजी नगराध्यक्ष सिन्नर, श्री सुभाष उगले, उत्तम काका उगले, सौ अनिताताई पानसरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते*. *याप्रसंगी श्री दत्ता वायचळे, श्री वाडेकर सर, श्री केरू पवार, श्री चतुर सर, सौ अश्विनी उगले, सूरज उगले, प्राचार्य श्री अशोक बागुल आदींची समायोजित भाषणे झाली*. *सत्कार मूर्ती उपप्राचार्य श्री दिलीप उगले सर यांनी आपल्या सेवापूर्तीबद्दल सांगताना एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू असल्याचे सांगितले. ज्या ज्ञान मंदिरात गेली 32 वर्षे ज्ञानदानाचे काम केले. त्या ठिकाणी उद्यापासून नसणार आहे याचे दुःख तर यापुढील काळात आहे. पण यापुढे कुटुंबासाठी व समाजासाठी वेळ भरपूर देता येईल, द्यावा लागणार असल्याचे समाधान अशी भावना असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयातर्फे सत्कार मूर्ती श्री दिलीप उगले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.इशस्तवन, प्रतिमापूजन व स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर, श्रीमती जयश्री ढुमणे व श्रीमती दिपाली तांबे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय पर्यवेक्षक श्री उत्तम उगले यांनी केला तर श्रीमती सुनिता आव्हाड यांनी आभार मानले
