
नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीयम मध्ये जागतिक महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला .आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल शाळेमध्ये महिला दिन निमित्त निरनिराळ्या प्रकारचे स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांनी चे मनोबल वाढविले. अनेक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा मध्ये सहभागी होऊन महिला दिनाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती ईशस्तवनाने, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पूजनाने केले. काही विद्यार्थीनी आजच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचे वेशभूषा करुन एकांकिका सादर केले.

मुख्याध्यापिका श्रीमती. पि. जी धात्रक यांनी सर्व विद्यार्थ्यांना महिला च्या जीवनाची पाश्वभूमी व आजच्या शतकामधील तिची प्रत्येक क्षेत्रातील भुमिका स्पष्ट केले. आसावरी राऊत विद्यार्थीने कार्यक्रमातचे सुञसंचालन व आभार अनुष्का गिते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक महिला दिन संपन्न झाला.
