
वडांगळी.( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी ता. सिन्नर या विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयात कार्यरत सर्व महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ महिला शिक्षिका मोहिनी क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमातांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मोहिनी क्षीरसागर यांच्या शुभहस्ते तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आशालता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शंकरराव सांगळे, विजय कोकाटे, भाऊसिंग पंढुरे, मोहिनी क्षीरसागर, आशालता पाटील,सीमा भामरे, स्मिता वाघ, उज्वला गांगुर्डे, शीला आवारे, राजश्री बोडके, कांचन कोकाटे,मनीषा आगळे, स्वाती बोराडे, अनिता खुळे,अश्विनी भगुरे, अर्चना घुले, सुरेखा खुळे, निलोफर शेख आदी शिक्षिका उपस्थित होत्या. ज्येष्ठ शिक्षक शंकरराव सांगळे,सुभाषराव ठोक व विजय कोकाटे यांच्या शुभहस्ते सर्व महिलांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन महिला दिनी येथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या स्त्रियांच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्याचप्रमाणे साक्षी शेलार, श्रद्धा सांगळे, निकिता गीते व जयदीप चव्हाणके या विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान महिलांची कामगिरी या विषयावर भाषणे केली. शिक्षक मनोगतात राजश्री बोडके यांनी आजची स्त्री चूल व मूल यापलीकडे जाऊन शिक्षण, औद्योगिक, अवकाश संशोधन ,आरोग्य व इतरही विविध क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. स्त्रीची उंची तिच्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचली आहे. असे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना मोहिनी क्षीरसागर म्हणाल्या की आजची स्त्री ही जगातील प्रत्येक देशाला उच्च पदावर नेण्यासाठी कार्यरत आहे. स्त्रीचा समाजात सन्मान राखला गेला पाहिजे. आजची स्त्री सुरक्षित नाही. तिची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. त्यासाठी समाजात स्त्री विषयीची भावना बदलली पाहिजे.मानवी मानसिकता बदलून प्रत्येक स्त्रीमध्ये आई व बहीण पाहीली पाहिजे असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी जंगम व प्रांजल खुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता गीते हीने केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
