
नांदगाव (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या नांदगाव शाखेच्या नवीन कार्यकारणी निवडणूक 2025 करिता दिनांक 19 जून 2025 रोजी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली. या मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. असता प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आलेला असल्यामुळे अध्यक्ष पदासाठी श्री पंढरीनाथ सटवाजी गायकवाड तसेच सचिव पदासाठी श्री अरुण रमेश मढवई, कोषाध्यक्ष पदासाठी सौ. वनिता सुरेश बर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून मुकुंद दत्तात्रय निकुंभ, संकल्पना शांताराम काटे, नारायण शंकरराव सरनाईक, गोविंद राजेंद्र शिंदे, सुशील सुभाष तायडे, सौ शर्मिला ज्ञानेश्वर उदावंत यांचे प्रत्येक एका पदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.डी. निकुंभ यांनी जाहीर केले. अध्यक्ष व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अभिनंदन करण्यात आले.
