
उपसरपंच सौ. सुनंदा मुक्ताराम बागुल ग्रामपंचायत रोहिले बुद्रुक
नांदगाव (प्रतिनिधी )नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे व नियमाप्रमाणे आणि शासनाच्या सण 2018 च्या कुटुंब पत्रक यादी वरून आठ अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समिती यांच्याकडे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पाठवली होती. या यादीवर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु नांदगाव पंचायत समिती कार्यालयाकडून अनावधानाने आठ अपात्र लाभार्थ्यांच्या नावे पहिला हप्ता वितरित करण्यात आला. नंतर नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या हे नजरेत आल्यानंतर त्यांनी रोहिले बुद्रुक येथील आठ अपात्र लाभार्थ्यांना त्यांनी काढलेला पहिला हप्ता वसुलीसाठी दिनांक 12 मार्च 2025 रोजी बँक ऑफ इंडिया यांना सदर आठ घरकुल लाभार्थ्यांची हप्ता वसूल करून संबंधित खात्यावर वर्ग करण्यास सांगितले होते. परंतु लाभार्थ्यांनी सदरचे हप्ते बँकेतून काढून घेतल्याने. नांदगाव पंचायत समिती यांनी दिनांक 2 जून 2025 रोजी सदरचे हप्त्याचे पैसे वसूल करण्याचे आदेश लाभार्थ्यांना दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाने काढलेल्या आदेशानुसार व नियमानुसार नांदगाव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाने सण 2018 मध्ये केलेल्या सर्वे मध्ये कुटुंब यादीतील गरीब व गरजू पात्र घरकुल मंजूर करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 2018 च्या कुटुंब पत्रक यादीनुसार खरोखर पात्र व गरजू आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती. त्याप्रमाणे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी सन 2018 च्या कुटुंब पत्रक यादीची शहानिशा करून व आज रोजी असलेल्या घरांची व लाभार्थ्यांची पाहणी करून आठ अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीला पाठवली होती. परंतु यात देखील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी काही अपात्र लोकांची नावे नांदगाव पंचायत समितीला पाठविले नसल्याचे समजते. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नांदगाव पंचायत समितीकडे पाठविलेल्या आठ अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नांदगाव पंचायत समितीकडून अनावधानाने पहिला आप्पा वितरित करण्यात आला. हे नांदगाव पंचायत समिती यांच्या लक्षात आल्यानंतर नांदगाव पंचायत समितीने बँक ऑफ इंडिया यांना सदर लाभ त्यांच्या बँक खात्यावरून रक्कम संबंधित खात्यावर वर्ग करण्यासाठी पत्र बँक ऑफ इंडिया यांना पाठविले होते. परंतु अपात्र लाभार्थ्यांनी बँक खात्यावरुन पैसे काढून घेतल्यामुळे तो हप्ता संबंधित खात्यावर बँक ऑफ इंडिया बोलठाण शाखेला करता आले नाही. त्यामुळे नांदगाव पंचायत समितीने दिनांक 2 जून 2025 रोजी सदर आठ अपात्र लाभार्थ्यांना सदरचा हप्ता वसुलीचे आदेश दिले आहेत. या आठ लाभार्थ्यांपैकी मच्छिंद्र कारभारी गायके यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयाकडे दिनांक 5 जून 2025 रोजी तक्रार अर्ज दाखल केला असून त्यांनी सदर तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की मी स्वतः अर्जदार रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव येथील कायम रहिवाशी असून मला व इतर काही नागरिकांना आपल्या कार्यालयामार्फत पी. एम. आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. व तो आम्हाला मिळाला असून आम्ही यापूर्वी कोणत्याही प्रकारचा घरकुलाचा लाभ घेतलेला नाही. मी स्वतः अल्पभूधारक असून मला घराची आवश्यकता आहे. तसेच गावातील काही राजकीय पोटी व वैयक्तिक वाद मनात ठेवून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व इतर संबंधित व्यक्ती वैयक्तिक हस्तक्षेप करून ही कारवाई करण्यास भाग पाडतात. तसे पाहता घरकुल योजना ही सगळी सारखीच असते. घरकुल नियम हे सारखे असतात. इतर घरकुल लाभार्थी यांना वेगळे नियम व आम्हाला विरेनियम असे का? गावातील चालू घरकुल व झालेले घरकुल यांचे कुटुंब पत्रक पाहता व एका कुटुंबातील एकच लाभ मिळावा असे नियम असेल तर झालेल्या घरकुलाची चौकशी व्हावी व सदर लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम दंडासह वसूल करण्यात यावी व केलेली कार्यवाही ही आम्हाला लेखी स्वरूपात मिळावी. तू किती कारवाई न केल्यास मला लोकशाही मार्ग अवलंबवा लागेल याची दखल घ्यावी. असे नांदगाव पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविलेल्या तक्रार म्हटले असून सदरच्या प्रति माहितीस्तव जिल्हा परिषद नाशिक, पोलीस निरीक्षक नांदगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत सरपंच, उपसरपंच यांना विचारणा केली असता सरपंच ठकुबाई देविदास पवार यांनी सांगितले की शासनाच्या आदेशाच्या व नियमानुसार अपात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समिती यांच्याकडे पाठविली असून यात कुठल्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही. गावातील सर्व पात्र व गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुलाचा लाभ मिळावा हाच आमचा उद्देश आहे. परंतु शासनाची नियम व आदेश आम्हाला कोणत्याही प्रकारे डावलता येत नाही. आम्ही खोटी माहिती देऊन घरकुलाचा लाभ दिला तर गावातीलच काही व्यक्ती राजकीय द्वेषापोटी तक्रार अर्ज करतील व आम्ही त्यास जबाबदार राहू म्हणून पुढील आमच्यावर कारवाई होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशा व नियमानुसार सन 2018 च्या शासनाच्या सर्वेनुसार कुटुंब पत्रक यादीवरून व आज रोजी त्यांच्या कुटुंबाची पाहणी करून अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव समितीला पाठवलेली आहे. सदर तक्रारदाराने केलेले आरोप बिन बुडाचे व खोटे आहेत. त्या अर्जाची सखोल चौकशी आम्ही स्वतः करण्यास लावून आपला माझा प्रमाणे कारवाई करण्यास नांदगाव पंचायत समितीला भाग पाडू. परंतु सदरचा तक्रार अर्ज खोटा व बीनबुडाचा निघाल्यास तक्रार दारावर देखील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने जाऊ असे म्हटले आहे. तसेच उपसरपंच यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या नांदगाव पंचायत समिती यांच्याकडे ग्रामपंचायतीने पाठविलेल्या आठ अपात्र लाभार्थ्यांच्या यादीवर माझी सही नाही. व मी सांगितल्याप्रमाणे व शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी अपात्र यादी केली नाही त्यामुळे मी या यादीला मंजुरी दिलेली नाही एवढेच नव्हे तर सदर यादीवर माझी स्वाक्षरी नाही. माझ्यावर जे आरोप केलेले आहे ते एक राजकीय द्वेषापोटी पोटी केले आहे. तसेच त्यांचे नियमानुसार अतिक्रमण ग्रामपंचायतने काढले याचाच वाचता काढण्यासाठी हेतू पुरस्कार सदर तक्रारदार आणि काही राजकीय व्यक्ती आणि कर्मचारी हे पुरस्कर माझ्यावर आरोप केले आहेत.ते आरोप बीनबुडाचे आहेत. शेवटी पाण्याची पाणी आणि दुधाचे दूध मी केल्याशिवाय राहणार नाही. कुत्ता दुखता है हत्ती चलता है याप्रमाणे माझी वृत्ती आहे. तसेच गावातील प्रत्येक गरजू व पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मी घरकुलाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. व लाभ मिळावा हीच माझी इच्छा आहे. असे उपसरपंच सुनंदा बागुल यांनी बोलताना म्हटले आहे.
