
मखमलाबाद विद्यालयात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करतांना प्राचार्य संजय डेर्ले, उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील,तसेच जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रथम प्रताप काळे यांनी आपल्या मनोगतात जागतिक महिला दिन का साजरा केला जातो हे सांगितले.सविता आहेर यांनी तर महिलांचा गुण गौरवगाथा गातच सुत्रसंचलन केले.कु.ईश्वरी पिंगळे,इ.८वी ई हिने जागतिक महिला दिन जगभरात कसा-कसा साजरा केला जातो याचे सविस्तर वर्णन केले.तसेच योगिता कापडणीस यांनी तर महिलांच्या गुण गौरवाबरोबरच महिलांचे नैतिक कर्तव्य,नैतिक जबाबदाऱ्यांवरही प्रकाश झोत टाकला.स्री व पुरूष यांच्या समविचारानेच कुटूंब व्यवस्था,समाज व्यवस्था तसेच विश्वनिर्मिती शक्य आहे. ईश्वराची उत्कृष्ट कलाकृती कोणती असेल तर स्त्री हिच आहे.तिचा सन्मान करण्यातच समाज उन्नती शक्य आहे.असे परखड विचार मांडले.

शेवटी प्राचार्य संजय डेर्ले यांनी अध्यक्षीय भाषण केले.प्राचार्यांच्या शुभहस्ते सर्व महिलांना पर्स,गुलाबपुष्प,भेटकार्ड देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेतलेल्या आदर्श महिलांच्या वेशभुषेत ई.८ई च्या विद्यार्थिनीं त्यांच्या कार्याची महती विषद करतच स्टेज वरती प्रगट झाल्या.त्यात प्रामुख्याने राजमाता जिजाऊ-तनुश्री राऊत,सावित्रीबाई फुले-राधिका डहाले,आनंदीबाई जोशी-तेजस्वीनी डंबाळे,कल्पना चावला-संजना थोरात,प्रतिभा पाटील-कोमल पिंगळे,सिंधुताई सपकाळ-शमिका पिंगळे,किरण बेदी-साक्षी चित्तारे,मदर टेरेसा-प्रमिला पवार.त्यांना इ.८अ च्या वर्गशिक्षिका पल्लवी पगार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी पल्लवी पगार यांनीच आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमप्रसंगी सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते*———————————————————— *फोटो* = *मखमलाबाद विद्यालयात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करतांना प्राचार्य संजय डेर्ले, उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी*
