
,नाशिक (प्रतिनिधी ) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक.या शाळेत आज शनिवार दि.०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मँडम व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व महिलांचे सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिंनींनी जागतिक महिला दिनानिमित्त विविध महिलांच्या भूमिकेतून महिलांचे विचार व्यक्त केले. त्यात जिजाऊच्या भूमिकेत कु.माही खैरनार ९-ब,राणी लक्ष्मीबाई – कु.समृद्धी शिंदे ९-ब,अहिल्याबाई होळकर – कु.पुनम कांबळे ९-अ,सावित्रीबाई फुले – कु.हर्षाली बागुल ९-ब,आनंदीबाई जोशी कु.भूमिका पाटील ९-अ,कल्पना चावला – कु.अक्षरा भोई ९-ब,किरण बेदी – कु.श्रद्धा देशमुख ९-ब तसेच कु.धनश्री वानखेडे व कु.पौर्णिमा कोठावदे ९-अ या विद्यार्थिंनींनी महिलांची माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेच्या जाँईट सेक्रेटरी सौ.संगिता चव्हाण मँडम यांनी महिला दिनाचे महत्त्व उदा.तून कथन करून थोर महिलांचे आदर्श,शिक्षण व ज्ञानातून चांगल्या गोष्टी केंद्रित करा,असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री.पी.जी.पुंड,पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.वैशाली जाधव मँडम,सौ.चेतना टोपले मँडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कु.प्राची गोसावी ९वी ब तर आभार कु.प्रज्ञा ठोके ९वी ब हिने केले.फलकलेखन श्री नितीन सोनवणी सरांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,असि.सेक्रेटरी मा.सौ.सरला तायडे मँडम,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री परशराम पुंड सर,श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी सर,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,जाँईट सेक्रेटरी सौ.संगिता चव्हाण मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनी उपस्थित होते.
