
साकोरे ( प्रतिनिधी)- 8 मार्च रोजी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त सुरुवातीस देशातील थोर महिलांच्या प्रतिमांचे पूजन विद्यालयाच्या महिला शिक्षिकांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी एम.पी. व पर्यवेक्षक भोई जे.के. यांनी विद्यालयातील महिला शिक्षिकांचे सत्कार केले. कार्यक्रमाप्रसंगी अनेक विद्यार्थिनींनी भाषणे केली तसेच विद्यालयाच्या शिक्षिका खैरनार बी. आर. यांनी जगात आणि देशात जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली? का झाली? याविषयी माहिती सांगितली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी एम. पी. यांनी सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बागुल के. बी. मॅडम यांनी स्वीकारले. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच जन्माला आला पाहिजे या संकल्पनेला दुय्यम स्थान देऊन अनेक पालकांनी तसेच शिक्षकांनी मुलींच्या जन्माला प्राधान्य देऊन मुलींना वंशाची पणती म्हणून प्राधान्य देऊन एक आदर्श निर्माण केले आहे अशा पालकांचे व शिक्षकांचे विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक भोसले एस. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीने केले. सूत्र संचलन मयुरी बागुल व आभार जान्हवी जेजुरकर या विद्यार्थिनींनी केले.
