
पोखरी (प्रतिनिधी )माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी, तालुका नांदगाव .जिल्हा नाशिक. येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. जिभाऊ बोरसे सर ,यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. घोडके सर.यांनी केले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी, युवराज भोई, घनश्याम वाघमोडे,कावेरी शिंदे, गीता काकळीज चांदणी पारधे, वर्षा देवरे,या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कर्मचारी वृंदातून निकम मॅडम, पवार मॅडम ,तसेच श्री घोडके सर ,यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोडके सर, यांनी केले कार्यक्रमास मुख्याध्यापक बोरसे सर, शेवाळे सर ,कदम सर, निकम मॅडम ,पवार मॅडम ,संजय वाघचौरे, इत्यादी कर्मचारी व असंख्य विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. एकंदरीत कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.
