
नांदगाव (वार्ताहार )येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या व्ही जे हायस्कुल मध्ये डॉ. यशवंत (दादा ) बर्वे प्रेरित डॉ. सुमनताई यशवंत बर्वे यांचे स्मरणार्थ स्त्री शक्तीचा जागर व माहिला सबलीकरण हया संकल्पनेतून कर्तृत्वान महिलांचा कार्य परिचय व त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो . व त्या महिलांचा सत्कार सोहळा निमित्ताने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रेरणा मिळावी यासाठी उपक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमासाठी NCC पथकाने ढोल ताशाच्या गजरात त्यांचे आगमन झाले

विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मान्यवराचे हस्ते प्रमुख अतिथी मा. डॉ. जयंत यशवंत बर्वे , कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मा. सौ विनया विकास काकडे ,अध्यक्ष मा. श्री.संजीव धामणे , मा. मुख्या श्री.ठाकरे एल एन् , उपमुख्या . श्री .खालकर खंडू , पर्यवेक्षक श्री. मिलिंद कायस्थ पालक संघ उपाध्यक्ष श्री. संदिप जेजुरकर श्रीमती जान्हवीशर्मा आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते

.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्या ठाकरे यांनी डॉ. बर्वे यांचा कार्यपरिचय करून दिला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री.आहिरे प्रविण यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. कुणाल जोशी यांनी केले आपल्या मनोगतात डॉ. बर्वे यांनी आरोग्या विषयी उपयुक्त मार्गदर्शन केले . त्यावरिल काही उपाय सुचविले त्यांचे आई वडिलांचे कार्य पुढे चालु राहिल यासाठी मी पर्यन्त करेण . शालेय उपक्रमांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलेमा. विनयाताई विकास काकडे यांचा सन्मान पत्र व मेमोन्टों देवून सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात श्रीम काकडे यांनी आपले चारित्र्य कसे जबावे या विषयी “स्त्रीत्व जपतांना ” या कवितेतून मांडले , सर्वगुण संपन्न चारित्र्य ,बलवान कर्तृत्वान स्त्री म्हणून जगा .या प्रसंगी शाळेतील शिक्षिकाचें ऑक्सि प्लॅटं देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात तसेच माता पालक व छाजेड शाळेतील शिक्षिकांचाही सत्कार करण्यात आला अध्यक्ष श्री. धामणे सर यांनी आपल्या मनोगतात आदिशक्तीचे रूपाने वाईट वृत्तींचे नाश करावा आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करा हेच खरे शिक्षण आहे. मनोगत व्यक्त करतानां वर्षा भामरे यांनी स्त्री हि शर्टच्या तुटलेल्या बटणां पासून तुटलेला माणूस जोडण्याचे काम फक्त स्त्रीच करू शकते

. जायन्ट क्लब सदस्या श्रीम बोरसे मॅडम यांनी कवितेतून स्त्री विषयी कर्तृत्व व्यक्त केले. श्रीम शितल अत्रे ,श्रीम सांगळे निवेदिता यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. मिलिंद कायस्थ यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृदं शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले💐💐
