
सिन्नर (प्रतिनिधी )- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात विद्यालयमार्फत स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती देवून मान्यवरांचे स्वागत केले.

बऱ्याच कालावधी नंतर शाळेची घंटा वाजल्याने आज विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकू आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. विद्यार्थी एकमेकाची आस्थेने व प्रेमाने विचारपूस करीत होते. विद्यार्थी गप्पा गोष्टीत रंगले होते .विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सडा टाकून रांगोळी काढली होती. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते.व्यासपीठावर सरपंच रामनाथ पावसे, सदस्य भाऊ वारुंगसे, शरद माळी, अरुण वारुंगसे,बबनराव वाजे , कारभारी वारुंगसे,विजय दादा वाजे, वसंतराव जाधव ,प्राचार्य रंगनाथ उगले , पर्यवेक्षक उल्हास पवार आदिंसह पालक उपस्थित होते.यावेळी नारायण वाजे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.शिक्षक शिकवित असतांना विद्यार्थ्यांनी वर्गात समरस व्हावे. चांगला अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करून आई-वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आव्हान वाजे यांनी केले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आंतर्गत मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. इयत्ता १२ वी व इयत्ता १० वीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षपदी बबनराव वाजे यांची निवड झाल्याबद्दल तसेच तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी कारभारी वारुंगसे यांची निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पी.आर.करपे यांनी तर आभार पर्यवेक्षक उल्हास पवार यांनी मानले.यावेळी रामदास वारुंगसे,सोमनाथ पगार, सोमनाथ गिरी,ए.रबडे,के.एस.शिंदे, सुनिल ससाणे, रेवणनाथ कंगणे, एस.बी.गुरूळे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
