
पळसे येथील नासाका विद्यालयात शाळा प्रवेशोत्सवाप्रसंगी कामगार नेते प्रशांत कापसे, कवी शरद आडके, मुख्याध्यापक अरुण पगार, पालक, शिक्षक आणि कर्मचारीवर्ग.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करून नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे, नानेगावच्या श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक आणि कवी शरद आडके यांसह पालक, शिक्षक आणि कर्मचारी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
