
नांदगाव ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित होरायझन अकॅडमीत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अक्षदा कुलकर्णी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आदींचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक भाषण शाळेच्या प्राचार्या श्रीमती. पुनम मढे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी विविध क्षेत्रात आपली भूमिका बजावावी. सर्व क्षेत्रात महिलांनी सहभागी व्हावे मुलांप्रमाणेच मुलींना उच्च शिक्षण द्यावे. या उद्देशानेच आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे “रॅम्प वॉक”चे आयोजन करण्यात आले उपस्थित महिला पालकांनी रॅम्प वॉक चा आनंद घेतला. शाळेच्या सर्व महिला शिक्षकांनी देखील सुंदर रॅम्प वॉक केला. शालेय विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी तसेच डॉक्टर,इंजिनियर आदींची वेशभूषा करून भाषणात त्यांच्या जीवनावर माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी ॲड.विद्या कसबे, डॉ.योगिनी चव्हाण, समाजसेविका कोळगे, आरोग्य विभाग प्रमुख सौ.काकळीज आदि. सह पालक,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शालिनी गोयल यांनी केली आभार दिपाली भामरे यांनी मांडले.
