
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात महिलादिनी आपले विचार व्यक्त करताना प्रवचनकार व कीर्तनकार ह भ प पूजा वाघ , व्यासपीठावर उपसभापती मोगल, प्राचार्य दवंगे, हभप पूजा वाघ व कर्तुत्वान महिला
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता 8- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात 8 मार्च महिला दिनी विविध क्षेत्रातल्या कर्तुत्वान महिलाचा व विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ लताताई मोगल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, प्रसिद्ध कवयित्री वैशाली जाधव, प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार ह भ प पूजाताई वाघ आदींसह विविध क्षेत्रातल्या मान्यवर महिला उपस्थित होत्या सुरुवातीला कर्तुत्वान महिलांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले प्रास्ताविकातून प्राचार्य दवंगे यांनी विद्यालयात महिला दिन राबविण्याचा हेतू विशद केला यावेळी कवयित्री वैशाली जाधव यांनी आपल्या विविध कवितांच्या माध्यमातून उपस्थित महिला, विद्यार्थी व सेवकांना मंत्रमुग्ध केले तसेच प्रवचनकार व कीर्तनकार हभप पूजा वाघ यांनी विविध उदाहरणे देत उपस्थित महिला व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत महिला दिन कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले उपसभापती डी बी मोगल यांनी संस्थेच्या वतीने सर्व कर्तुत्वान महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या मुकुंद ताकाटे यांनी अतिथींचा परिचय करून दिला सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार श्रीम शितल शिंदे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, अभिनव मुख्याध्यापक राहुल मोगल,सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच अनुपमा जाधव, वैशाली मोगल, सुनिता मोगल, आरती मोगल,नीता कोपटे,जयश्री गुरगुडे,अँड निर्मला अरिगळे,अँड रोहिणी मोगल,अँड संगीता चव्हाण, अँड नीलम निकम, अँड वैशाली निकम, ग्रामपंचायत सदस्य सुनिता मोगल, विमल मोगल, माधुरी जाधव, शितल नळे, सुरेखा औसरकर, निकिता मोगल, इंदुबाई राहणे, कल्याणी उगले,कौशाबाई हळदे, शिला पारधे, सोनुबाई निरभवणे, सुवर्णा भंडारे, रोहिणी मोरे,सोनाली काठे, स्वाती डोकबाणे, ललिता पारधे, गंगाताई रहाणे,आशा गंगावणे, स्वप्नजा मोगल,शोभा वडजे, कल्पना गाडेकर, मीरा पडोळ, प्रिया वाहुळ आदी उपस्थित होत्या.
