
ओझर: येथील बोरस्ते विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना ‘मविप्र’ महिला संचालिका शोभाताई बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदी
ओझर:(प्रतिनिधी ) दि.८ वार्ताहर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी अतिथींचे स्वागत करून प्रारंभी दीपप्रज्वलन सरस्वती, छत्रपतींचे पूजन करून गीतमंचाने ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी महिलादिन साजरा करण्याचे महत्त्व विशद करून उपस्थितांना अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मविप्र’ महिला संचालिका शोभा बोरस्ते होत्या. व्यासपीठावर अव्दिता शिंदे डीवायएसपी, महिला संचालिका शोभाताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, उद्योजिका शितल गायकवाड, कावेरी महाले, माजी विद्यार्थिनी तलाठी ऋतुजा पवार, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील, भूषण महाले, मंगल सावंत, रेखा देशमाने उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील मंगल सावंत यांच्या हस्ते झाला. नांदी फाउंडेशन पुणे यांचेतर्फे विद्यार्थिनींना शैक्षणिक किटचे वितरण संचालिका शोभा बोरस्ते, शालनताई सोनवणे, संघटक भाग्यश्री बंदरे, माधुरी पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कावेरी महाले यांच्या हस्ते विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. सेवक संगीता भदाणे, महेंद्र डांगले, विशाल पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करून सत्कार केला. यावेळी ऋतुजा पवार यांनी महिला दिनाचे महत्त्व सविस्तर विशद करीत पुढे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उच्चशिक्षण व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले. अद्विता शिंदे यांनी आपल्या मनोगतात महिला सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात संचालिका शोभा बोरस्ते म्हणाल्या, महिलांनी राजकारण शिक्षण आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान कला साहित्य क्षेत्रात प्रचंड भरारी घेतली असून नवीन पिढीने कीर्तिमान होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून उच्चशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. फलक रेखाटन शिक्षिका मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले, शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील यांनी मानले.
