
वटसावित्री पौर्णिमा निमित्त वडाची पूजा करताना सिन्नरच्या विजयनगर मधील महिला
सिन्नर (प्रतिनिधी)सात जन्म हाच नवरा मिळू दे,अशी प्रार्थना करून वडाच्या झाडाला सात फेरे मारून सुहासिनींनी वडाची यथाविधी पूजा करण्यासाठी एकच गर्दी केली. सत्यवान सावित्रीचे स्मरण म्हणून या दिवशी उपवास करून व्रत केले जाते. सुहासिनी यावेळी पारंपरिक साड्या परिधान करून नटून थटून वडाच्या पूजेसाठी घोळक्याने बाहेर पडतात. त्यांच्यात अमाप उत्साह यावेळी दिसून येतो. प्रत्येक महिलेने या दिवशी जर एक वडाचा वृक्ष लावण्याचा संकल्प केलातर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल व वृक्षारोपण तसेच त्याचे संवर्धन करण्याचे पुण्य पदरात पडेल, खरी सावित्रीची लेक म्हणून नावलौकिक वाढेल. पाऊस पडून,वसुंधरा समृध्द होईल.वाढत्या तापमानाला आळा बसेल,
