
नाशिक [ ग्रामिण वृत्तसेवा साहेबराव नंदन तात्या ] काळीज माझं साहित्य व सामाजिक साहित्य समुह छत्रपती संभाजी नगर यांच्या सामाजिक संस्थेच्या तीसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलन नाशिक येथे पार पडलेल्या काव्य मैफीलीत नाशिक येथील अलककार सुभाष उमरकर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने जेष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते, तसेच कवी, संपादक गुलाबराजा फुलमाळी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, साहित्यिक रविंद्रदादा मालूजंकर , संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा बेंद्रे, कवयित्री सौ. शारदा भामरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमरकरांना मानाचा फेटा, शॉल श्रीफळ बुके ट्रॉफी व सन्मान पत्र देऊन टाळ्यांच्या गजरात सन्मानित करून गौरविण्यात आले. उमरकर यांना या आधीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शेकडो सन्मान पत्रांचे ते मानकरी असून त्यांच्या नावावर लघुकथांचा अलक नामक संग्रह प्रसिद्ध आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रतिकुल परिस्थिती गरीबीची असली तरी साहित्य क्षेत्रात ते श्रीमंत आहेत. दिलदार मनाच्या हळव्या साहित्यिकाचा सन्मान हा खऱ्या अर्थाने नाशिकच्या मातीचा सन्मान असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
