

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३० वा दिवस* समस्त थोर स्त्री पुरुषांच्या जीवनात सर्वांहून बलशाली अशी प्रेरक शक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे “आत्मश्रध्दाच” होय. ‘आम्ही थोर होऊ ‘ ही उपजत जाणीव घेऊन ते जन्माला आले. आणि खरोखरच ते थोर बनले. तुमच्या या शरीरात केवढे ओज, केवढे तेज, केवढे चैतन्य, केवढ्या शक्ती अव्यक्त स्वरूपात विद्यमान आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या शास्त्रज्ञाला मनुष्यामधील सर्व शक्तींचे ज्ञान झाले आहे? मनुष्याला पृथ्वीतलावर आविर्भूत होऊन कोट्यवधी वर्षे लोटून गेली तरी त्याच्यामधील शक्तींचा अत्यल्प अंशच आतापर्यंत प्रकट झाला आहे. आपल्या आत्मचिंतनाचा, जाज्वल्य विचारांचा, ध्यानाचा स्वत:च्या जीवनावर असर होऊ द्या. स्वतःच्या सर्वशक्तीमत्वाच्या, स्वत:च्या महात्म्याचा, स्वतःच्या गौरवाच्या चिंतनाने स्वत:ला भरुन टाका. *स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ जेष्ठ शके १९४७*★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ८ जून २०२५
★ १९१५ लोकमान्य टिळकांनी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात “गीतारहस्य” हा महान ग्रंथ लिहून पूर्ण केला, तसेच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
★ जागतिक महासागर दिन.
