
मनमाड (प्रतिनिधी) स्त्री म्हणजे देवाने पृथ्वीवर बनवलेली उत्तम कलाकृती होय… स्री आदर हा सुंदर विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे… फक्त आज नाही तर दररोज तिचा सन्मान झाला पाहिजे… या विचाराप्रमाने विद्यालयात आज जागतिक महिला दिन विद्यालयाचे सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. *विद्येची देवता सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माॅ साहेब जिजाऊ* यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. *सुत्रसंचलन* कु. विद्या झाल्टे व सौम्या धात्रक यांनी केले. विद्यालयातील महिला शिक्षिका मगर मॅडम, देवढे मॅडम, हारदे मॅडम, जाधव मॅडम, कवडे मॅडम, जगताप मॅडम,कदम मॅडम यांचा सत्कार पुष्प देऊन करण्यात आला. शिक्षिका श्रीमती मगर मॅडम यांनी जागतिक महिला दिनाची सुरुवात व महत्व सांगितले. . कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सर्व शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. कदम सर, जगताप सर, ठाकरे सर, जोरवर सर, चव्हाण सर सोनवणे सर , व शिक्षकेतर सेवक निलेश शेळके,आकाश शेजवळ अन्सार भाऊ,सोमवंशी,शिंदे, यांचे सहकार्य लाभले.
