
नाशिक (प्रतिनिधी) : अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रसार, प्रचारासाठी ‘सूर आमच्या घरी’ या अनोख्या मैफिलीचे आयोजन श्री कैलाशनाथ रावत .यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त केले होते आणि स्नेहीजनांना अनोखी भेट दिली.

प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचे गायन वादन याचे आपले सोयीनुसार घरी, अंगणात, पार्किंग आणि टेरेसवर आयोजित करावे. आपल्यावरील प्रेमापोटी वाढदिवसाला उपस्थित मित्र, नातेवाईक, शेजारी-पाजारी हे यानिमित्ताने शास्त्रीय सुरावटीमध्ये रमतील व कलाकारांना व्यासपीठ मिळेल हा यामागे विचार आहे.पूर्वीच्या काळी कलेला राजाश्रय होता आता लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी.प्रत्येकाने पुढे यावे. विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सूर आमच्या घरी या उपक्रमासाठी विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर यांचे सहकार्य लाभले आहे. चार चौघं, चे विनायक रानडे , सी एल कुलकर्णी , एन सी देशपांडे.,समीर देशपांडे संजय कंक. ग्रंथ तुमच्या दारी व विश्वास ग्रुप यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.

‘सूर आमच्या घरी’ ही मैफील उदोजी मराठा बोर्डिंग ,गंगापूर रोड येथे सकाळी 7.00 वाजता संपन्न झाली. आजच्या मैफिलीत भक्ती पवार यांचे गायन व वैष्णवी जोशी यांचे बासरी वादन झाले. साथसंगत वैष्णवी भडकमकर (तबला), शुभांगी भावसार(संवादिनी), , पुष्कर जोशी (ध्वनी संयोजन) व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. वैष्णवी जोशी यांनी सुरुवात राग नटभैरव ने केली.त्यानंतर पहाडी रागावर आधारित धून सादर केली.शेवटी पायोजी मैने ..हे भजन सादर केले.भक्ती पवार यांनी सुरुवातीला राग अहिर भैरव सादर केला,विलंबित पारंपरिक बंदिश शब्द होते रसिया म्हारा. त्यानंतर दृत बंदिश आडा चौताल सादर केला ना लागे मोरी अखिया.कार्यक्रमाचा समारोप या भवनातील गीत पुराणे, व बाजे मुरलीया बाजे या गीतांनी केला.
