
सिन्नर (प्रतिनिधी ) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य मधुकर देशमुख,प्रमोद काकडे व सर्व महिला शिक्षिका यांनी केले.महिलांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानावर प्रकाश टाकत मधुकर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले

तसेच माधुरी वरंदळ यांना विद्यावर्धिनी संगमनेर यांच्यातर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.सविता काठे यांनी महिला दिनाचे महत्त्व व गरज उलगडून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी महिला सबलीकरण व सशक्तीकरण याबाबत महिलांचे अधिकार,कायदे,सुरक्षितता याची जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता कार्यशाळा,उद्बोधनवर्ग आयोजन करणे अशा विविध पैलूंना स्पर्श करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ईश्वरी लोंढे,जोया खतीब,मृण्मयी वाणी,सुवर्णा भाटजिरे,वैष्णवी आव्हाड,जान्हवी पाचोरे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,सत्कार दिक्षा लोणारे व श्रावणी कांडेकर यांनी केले तर आभार आंचल जाधव हिने मानले.
