फलक रेखाटन -कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.

,विराट कोहली जर्सी नंबर 18*कोणत्याही क्षेत्रात अपार मेहनत, एकाग्रता,व कमालीचा संयम ठेवून आपले लक्ष्य पूर्ण करता येते याचे उत्तम उदाहरण भारतीय क्रिकेट टीम चा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याने या वर्षीच्या टाटा IPL ट्रॉफी जिंकून सिद्ध केले. धेय्य व विजय जवळ येऊन अनेक दा चकवा देत पराभव स्वीकारावा आणि पुन्हा चिकाटीने त्याच धेय्याचा पाठलाग करून ते धेय्य साध्य करावे यासारखा आनंद जीवनात दुसरा तो काय? हे उदाहरण जीवन जगतानाही कामी यावे. सतत 18 वर्ष IPL ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्नं घेऊन RCB फ्रेंचायसी कडून खेळतांना RCB ला ही टाटा आय.पी.एल.ट्रॉफी 2025 जिंकून देण्यात विराट कोहली चा सिंहाचा वाटा आहे. त्याचे हे कार्य म्हणजे जीवनात योगायोग ,चमत्कार व नशिबावर अवलंबून न राहता कष्ट,मेहनत, जिद्द , संयम, व सातत्याने जग ही जिंकता येते. रंगीत खडू फलक रेखाटनातून भारताचा महान क्रिकेटपट्टू विराट कोहली चे हार्दिक अभिनंदन !
