
उरण (विठ्ठल ममताबादे )उरण पंचायत समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जितेंद्र चिर्लेकर- प्रशासन अधिकारी , संपदा कटोर राकेश पाटील , सुजन पाटील , डॉ.भोजने , उल्हास पाटील , तेजस जोशी , मीनल मगर आदी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विविध उपक्रम राबवून पंचायत समितीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
