
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२६ वा दिवस

जगात भिन्न भिन्न रूपे आहेत. हे सत्य आपण प्रत्यक्ष कार्यात उतरविले नाही. आपल्या ठिकाणी इतरांप्रती सहानुभूती नाही, सहृदयता नाही, हृदयात कळवळा नाही. म्हणूनच तर आपल्या समाजाची अशी ही अवस्था झाली आहे. समाजाची ही शोचनीय अवस्था आपण वेळीच दूर केली पाहिजे. पण धर्म नष्ट करून नव्हे, तर धर्माच्या उदात्त, महान तत्वाचे, शिकवणुकीचे, संस्कारांचे अनुसरण करून आणि धर्माची स्वाभाविक परिणतीच अशा धर्माच्या प्रगाढ सहृदयतेची त्या शिकवणीला जोड देऊन जाते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ४ जून २०२५
★ महेश नवमी, कुमारी पूजन
★ १९४६ दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिध्द गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांचा जन्मदिन
★ १९४७ लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिन
★ राष्ट्र सेवादल दिन.
