.

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२० वा दिवस* तथाकथित सुशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या आधुनिक भारतीयांना वाटते की, पश्चात्यांच्या कल्पना, त्यांची भाषा, त्यांचा पेहराव, त्यांची खाद्यसंस्कृती, त्यांच्या परंपरा या सर्वांचा आपण अंगीकार केला तर आम्ही देखील त्यांच्या सारखेच सुशिक्षित, बुद्धिमान, शक्तिमान, सर्वसत्ताधीश होऊ शकतो. मात्र प्राचीन भारतीय संस्कृती असे म्हणते की, दुसऱ्यांचे अंधानुकरण केल्याने त्यांच्या कल्पना आपल्याला कधीच आत्मसात करता येत नाहीत. स्वतः मिळवल्याखेरीज काहीच प्राप्त होत नाही. सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव कधी सिंह म्हणून मिरवू शकले काय? *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ८ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २९ मे २०२५
★ १९१७ अमेरिकेचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मित्र जॉन एफ. केनेडी यांचा जन्मदिन.
★ १९७२ दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा स्मृतीदिन.
★ १९८७ लोकदल पक्षाचे संस्थापक भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा स्मृतीदिन.
★ २०१० समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचा स्मृतीदिन.
