
रावळगाव :(प्रतिनिधी)- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ०७ मार्च २०२५ या रोजी वार्षिक गुणगौरव समारंभाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज हे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष मा. वैशालीताई वाघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषद सदस्य मा. सागर वैद्य, पालक प्रतिनिधी मा. अविनाश बच्छाव, मा. कमलाकर रौंदळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अदिती काळे व प्रा. कामेश गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.क्यू.ए.सी. विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र मिसर यांनी केले, त्यात त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक गुणगौरव समारंभाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. सागर वैद्य पुणे विद्यापीठ पुणे येथील व्यवस्थापन परिषद सदस्य मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय समाजामध्ये गुरूला खूप महत्त्वाचे स्थान असून, प्रत्येक व्यक्तींच्या अंगी एक वेगळी शक्ती असून प्रत्येक व्यक्तीमध्ये हनुमाना सारखी शक्ती दडलेली असते, ती जागृत करण्याचे काम गुरूच्या योग्य मार्गदर्शनामुळेच होत असते, त्यामुळे गुरूला जीवनात महत्वाचे स्थान आहे. वर्तमान युग हे स्पर्धेचे युग असून, वर्तमान युग हे स्पर्धेचे युग असून, या काळात टिकून राहण्यासाठी व रोजगार प्राप्तीसाठी प्रतेकाने काळाशी सुसंगत असेच ज्ञानार्जन करावे, असे प्रतिपादन केले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, आजचा काळ हा स्पर्धेचा काळ असून, या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतोच त्यामुळे विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळावी व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गुणगौरव समारंभ महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्षाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यापीठ परीक्षेमध्ये मागील वर्षात पदवी व पदव्युत्तर वर्गातील सर्व शाखेतील सर्व वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे, विद्यापीठीय विविध क्रीडा स्पर्धा प्रकारामध्ये यश संपादन केलेल्या व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रिडा स्पर्धेत सहभागी होऊन नावलौकिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, महाविद्यालय स्तरावरील आयोजित निबंध स्पर्धा, भिंतीपत्रक प्रदर्शन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे गट प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळामार्फत राबविलेल्या विविध उपक्रमात व आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. भरत आहेर, प्रा. मनीष ठोके, प्रा. प्रशांत निकम, प्रा. राज ठाकरे, प्रा. आकेश दुकळे, प्रा.कल्पेश खैरनार, प्रा. वर्षा पवार, प्रा.सौ.जी.एस.खैरनार, प्रा. सौ. मोहिनी आहेर, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. कावेरी जाधव, प्रा. सोनम पाटील, प्रा.प्रियंका भामरे, चेतना हिरे, यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक दिपक पवार, महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव, सचिन भदाणे, राहुल अहिरे, चेतन पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
