
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८३८ वा दिवस
जीवनसंग्रामात वर्षोनुवर्षे सतत व्यग्र राहिल्याने या अज्ञानी, दिन-दलित, पिडीत लोकांत ज्ञानाचा उदय झाला नाही. मानवी बुद्धीने नियंत्रणाखाली ठेवलेल्या यंत्राप्रमाणे ते सारखे राबत राहिले आणि बुद्धिमान चतुर लोकांनी त्यांच्या परिश्रमाचे व उपार्जनाचे सार तेवढे आपण स्वतःच लाटले. सर्व देशांमध्ये हेच झाले पण आता मात्र काळ पालटला आहे. हळूहळू या अन्य जातींना ही गोष्ट उमजत आहे. त्या एकत्र येऊन संघटित रीतीने प्रस्थापितांच्या विरुद्ध उभ्या राहून आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. संघटीत होऊन संघर्ष करीत आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १६ फाल्गुन शके १९४६
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. ७ मार्च २०२५
★ १६४९ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन.
★ १९६१ भारताचे दुसरे गृहमंत्री, भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

